🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

शिरवली आरोग्य केंद्रास शिक्षक परिषदेचा मदतीचा हात 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा माणगांव यांच्या वतीने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनखाली व रायगड जिल्हाध्यक्ष संजय निजापकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालये व आरोग्य केंद्राना मदत करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक  भाग म्हणून माणगाव तालुकाध्यक्ष गणेश निजापकर यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील शिक्षकांनी निधी जमा करून आरोग्य केंद्रांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिक्षक परिषदेने माणगाव कोविड सेंटर येथे कोविड रुग्णांना अत्यावश्यक औषधे, टॅबलेट तसेच माणगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठीचे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

माणगांव तालुक्यातील शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्रास फेसशिल्ड, ऑक्सिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर कॅन, एन95 मास्क इत्यादी साहित्य डाॅ. यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश निजापकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे, बबन मोहिते, दिगंबर खटके, प्रविण गोरे, पांडुरंग काळे व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog