महावितरणाचे पितळ अवकाळी पावसाने केले उघड! 

शहर अंधारात, नागरिक हैराण 

तळा (संजय रिकामे) : शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी येण्यास सुरुवात होताच लोक काहीसे सुखावले होते. पण महावितरणने ते काही मिनिटांतच हिरावून घेतले. तळा शहर आणि ग्रामीण भागात रात्री आणि दिवसा वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. रात्री दहा वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू झाला. तो शनिवारी दुपार पर्यंत कायम होता. लाखो ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. उकाडा, डासांच्या उपद्रवामुळे झोपेचा चक्काचूर झाला. महावितरणने पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा करण्याचे अशवासन आताच फोल ठरले आहे. एवढेच नव्हे, विजेचा रात्रभर लपंडाव सुरू राहिल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 

रात्री एकनंतर लाईट आली परंतु पुन्हा सकाळी अनेक भागांत वीज गायब झाली होती. पहिल्याच पावसाने महावितरणाचे पितळ उघडे केले आहे. सुरवातीला फाॅल्ट सापडला नाही नंतर पढवण लाईन येथे मेजर फाॅल्ट असल्याने लाईट नव्हती असे समजते कर्मचारी आणि अधिकारी यांनी रात्रभर मेहनत घेत लाईन सुरु केली परंतु दुपारी पुन्हा लाईट गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली त्यामुळे विजेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असुन तालुक्याला स्वतंत्र वीजपुरवठा मिळाल्या नंतरच शहर आणि ग्रामीण भागात विज पुरवठा सुरळीत होईल असे बोलले जात आहे.विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक भागांत पाणी पुरवठा करता आलेला नाही.

Popular posts from this blog