पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्प
तळा (संजय रिकामे) : सध्या करोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत, असे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. ही बाब लक्षात घेऊ आ.अनिकेत तटकरे यांनी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने तळा तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तळा प्राथमिक आरोग्य केंद्रा करिता देण्यात आली त्यावेळी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालक मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडले आ.अनिकेत तटकरे यांनी मात्र अगदी वेगळ्या पद्धतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. फित कापण्याच्या औपचारिकतेपलीकडे जात रुग्णवाहिका चालवून आ.अनिकेत तटकरे यांनी लोकार्पण पार पाडले. त्यामुळे हा सोहळा लक्ष्यवेधी ठरला.
तळा तालुक्यात आरोग्य सुविधांबाबत लोकांची अनेक गाऱ्हाणी होती. ही बाब ध्यानात घेवून पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. स्थानिक विकास निधीच्या पुढे जावून तटकरे कुटुंबीयांकडुन सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या मार्फत आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना तळा तालुक्यासाठी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात आली यासाठी सर्व तळेवासीयांनी पालकमंत्री अदिती तटकरे आणि आ.अनिकेत तटकरे यांचे आभार मानले आहेत या लोकर्पण सोहळ्यासाठी सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, राजिप महीला बाल कल्याण सभापती गीता जाधव, राजिप सदस्य बबन चाचले, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, माजी उपनगराध्यक्षा सायली खातु, नगरसेविका नेहा पांढरकामे नगरसेवक अॅड. चेतन चव्हाण, नगरसेवक चंद्रकांत रोडे, अॅड उत्तम जाधव वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल बिरवडकर, डाॅ. गोरेगावकर, डाॅ. विद्या घोसाळकर, सौ. मुळे आदि मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्हात सुनिल तटकरे यांचा सामाजिक कार्याचा वारसा मोठा असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र तथा सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. अनिकेत तटकरे हे ही सामाजिक कार्यात तन-मन-धनाने नेहमी तत्पर असतात. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा थैमान सुरु आहे. ग्रामिण भागातील रुग्णांना शहरात आणण्यासाठी रुग्णवाहिका कमी आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या बाबीचा सारासार विचार करुन आ. अनिकेत तटकरे यांनी पुढाकार घेऊन रुग्णवहिका तळेवासीयांच्या सेवेत दाखल केली. आ. अनिकेत तटकरे यांच्याकडून कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चक्रीवादळात अनेक शाळांचे नुकसान भरुन काढण्यासाठी केलेली आर्थिक मदत तळेवासी कधीच विसरणार नसून आज पुन्हा रुग्णवाहिका उपलब्ध करुन ते तळेवासीयांसाठी धावून आले आहेत त्यांचे मनापासुन आभार व्यक्त केले जात आहेत.