महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू

तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रायगड जिल्हा तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य कु. आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नाने बुधवार दि. १२ मे २०२१  रोजी तळा तालुक्यातील महागांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ४५ वर्षे वरील नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली लस साळशेत गावचे नागरिक कृष्णा लोंढे यांना देण्यात आली. तालुका ठिकाणापासून अंदाजे १५ कि.मी अंतरावर महागांव असल्याने लसीकरणासाठी तळा येथे यावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आज कोरोना महामारी रोगावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले असल्याने या भागातील महीला ग्रामस्थांना सोयीस्कर होणार आहे. पंचक्रोशीतील जनतेचीउत्तमसोय झाली असून वेळ व पैसा वाचला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.या लसिकरणासाठी तळा पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, महागाव सरपंच सुषमा कसबले,उपसरपंच सचिनजाधव अॅड. उत्तम जाधव, सचिन कदम, किशोर शिंदे, अनंत खराडे, नितीन कदम, कमलाकर मांगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद गोरेगावकर, डॉ. अमोल बिरवटकर, डॉ.लपाटील मॅडम, मोहीत (बाबू ) मोरे, आशा प्रवर्तक नूतन ठिगळे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र महागांवचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog