चक्रीवादळात विळे व पाटणूस परिसरात ग्रामस्थांचे लाखो रूपयांचे नुकसान 

तलाठी सचिन मिसाळ यांची माहिती

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील विळे पाटणूस परिसराला गतवर्षी निसर्ग चक्री वादळाने उध्वस्त केल्यानंतर ग्रामस्थ सावरत नाहीत तोवर पुन्हा एकदा या परिसराला ताऊक्ते चक्रीवादळाने झोडपले. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या थैमानानंतर साजे विळे येथील तलाठी सचिन मिसाळ व कोतवाल गोविंद गुलंबे यांनी तातडीने परिसरातील परिस्थितीची पाहणी केली व नुकसानग्रस्त ग्रामस्थांची यादी तयार करून प्रस्ताव शासनाला पाठविल्याची माहिती दिली आहे. 

निसर्ग चक्रीवादळात ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले होते त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात तलाठी मिसाळ यांनी फार मोलाची कामगिरी केली होती. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या ग्रामस्थांची यादी खालील प्रमाणे - 

शिवराम बाबू कोळी : इंदिरा नगर 17000 रू., रामचंद्र सहदेव साने : सणस वाडी 6000 रू., वनिता तुकाराम साने : 6750 रू., गोपाळ बाबू साने : कोंडे : 6000 रू., शैला बळीराम साने : सणस वाडी 24500 रू., बाळाराम तुकाराम मोरे : सणसवाडी 22500 रू., विश्वास नारायण पलांडे : पाटणूस 41500 रू., सुभाष शांताराम साने : सणसवाडी 6200 रू., आशा शांताराम साने : सणस वाडी 5000 रू., दिपक मारुती दिघे :सणसवाडी 4600 रू., धोंडू केशव साने : सणसवाडी 15420 रू., वसंत केशव साने : सणसवाडी 3000 रू. वरील उपलब्ध ग्रामस्थांची नावे दिली असून अजून बरेच नुकसानग्रस्त ग्रामस्थ तलाठी कार्यालयात भेट देत असून अजूनही तलाठी मिसाळ ग्रामस्थांच्या अर्जाची खातरजमा करीत आहेत. 

Popular posts from this blog