साई प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाकडून कोरोना किट वाटप
साई (हरेश मोरे) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड, तालुका माणगांव यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र साई येथे कोरोना किट साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतो. त्याप्रमाणे राष्ट्रहित, विद्यार्थी हित, शिक्षण हित, शिक्षक हित हे या संघटनेच ब्रीदवाक्य आहे. ज्या वेळेस देशावर संकट येते त्या वेळेस परिषदेचा प्रत्येक कार्यकता हिरहिरीने राष्ट्रीय कार्यात धावून गेला आहे.
या संघटनेचे संस्थापक मा. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शन नुसार, राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या संकल्पनेतून राज्यभर प्राथमिक विभाग यांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरु आहेत. रक्तदान, अन्नदान, कोविड केंद्र, आर्थिक निधी मदत, वैद्यकीय उपक्रणे साहित्य वाटप सुरु आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र साई याठिकाणी जिल्हाध्यक्ष संजय निजापकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ फेस शिल्ड, एक ऑक्सिमीटर, एक थर्मल गन, पाच लिटरचे सॅनिटायजर कॅन, मास्क जमा झालेल्या शिक्षक मदत निधी मधून सुपूर्द करण्यात आले. या वेळेस संघटनेचे माणगांव तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुहास चांदोरकर, माणगांव तालुका अध्यक्ष गणेश निजापकर, जिल्हा कार्यलयीन मंत्री जितेंद्र बोडके, राज्य प्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे, माणगांव पतपेढी संचालक समीर धाडवे, तालुका कार्यवाह सुमित भोजने, तालुका कोषाध्यश सतीश ढेपे, संघटक सूर्यकांत कासे, अनिल नाचपले, गोरक्ष गोडे, नूरखान पठाण, कैलास महाजन उपस्थित होते, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.