रायगड जिल्ह्यात वाहनांवरील स्टिकरचा गंभीर प्रश्न. धाक नसल्याने विविध प्रकारचे स्टिकर्स
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून चारचाकी वाहनांवर पोलीस, भारत सरकार, प्रेस, महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे स्टिकर लावून राजरोस पणे चार चाकी वाहन धावत असतात. विशेषत: मे महिना आणि दिवाळीमध्ये सुद्धा असे स्टिकर्स असलेली वाहने सातत्याने संचार करत असतात. त्यांच्यावर पोलीसांचा वचक किंवा पोलीसांकडून तपासणी होत नसल्यामुळे बनावटांचासुद्धा सुळसुळाट वाढलेला दिसत आहे.
आता तर काहींचा इतका आत्मविश्वास वाढला आहे की आपल्या वाहनावर मंत्री असा स्टिकर लावण्याचे धाडस काही जण करत आहेत. सुट्ट्यांमध्ये कुटूंबासोबत तसेच मित्रमंडळी पर्यटनासाठी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी चारचाकीने जात असतात सर्रासपणे पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार अशी स्टिकर्स लावलेली वाहने धावत असतात. कदाचित या वाहनांमध्ये स्फोटक द्रव्य, अमली पदार्थ, हत्यारे अशा गोष्टी असू शकतात.
अशा वाहनांची चौकशी होत नसल्यामुळे धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अवैध धंदे सुरळीतपणे चालण्याची शंकाही काहींनी बोलून दाखविली. अनेक ठिकाणी पोलीस तैनात असतात त्यांनी अशा प्रकारचे वाहन थांबवून चौकशी करणे गरजेचे आहे. पुरावा नसेल तर त्यांना समज किंवा कडक शब्दात तंबी देणे आवश्यक आहे. नाहीतर कोण आपल्याला विचारत नाही अडवत नाही असा मोठा गैरसमज निर्माण व्हायचा आणि या गैरसमजातून नव्या पळवाटा सुकर होतील. रस्त्या वरून धावणारी चार चाकी वाहन की ज्यांच्यावर अशी स्टिकर असतात ती सर्वच काही बोगस असतील असे नाही की काही खरे असतील असेही नाही! त्यामुळे खातर जमा होणे गरजेचे आहे. एखादी घटना घडली की मात्र जागोजागी कसून तपासणी केली जाते मग घटना घडण्यापूर्वी दखल घेणे योग्य आहे. अशा प्रकारचे स्टिकर्स लावलेली वाहन दिसल्यास त्यांची पोलीसांनी चौकशी करणे या काळात गरजेचे आहे.