श्रीवर्धनमध्ये डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

उपचारासाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने केला बलात्कार!

रायगड (समीर बामुगडे) : श्रीवर्धन बाजार पेठेत असलेल्या प्रवीण बंदरकर यांच्या दवाखान्यात पाच दिवसांपूर्वी फिर्यादी महिला छातीत दुखत असल्यामुळे दवाखान्यात गेली होती. सदर महिलेची तपासणी केल्यानंतर सदर महिलेस गोळ्या देऊन  रविवारी येण्यास सांगितले होते. रविवारी क्लिनिक बंद असल्यामुळे फिर्यादी महिला सोमवार दिनांक १९/४/२०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता  दवाखान्यात गेली असता तपासणी दरम्यान डॉक्टर विचित्र प्रकार करत असल्याचे जाणवले याबाबत विचारणा केली असता तपासत असल्याचे सांगितले. तसेच महिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. सदर घटनेची माहिती फिर्यादी महिलेने आपल्या पतीला दिल्यानंतर पतीने  श्रीवर्धन पोलीस स्टेशन गाठले व तेथे आपली फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी भा.दं.वि.कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असूनआरोपी डॉक्टर प्रवीण बंदरकर याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. गावडे करीत आहेत. 

Popular posts from this blog