...अन्यथा १ मे पासून रेशनिंग वितरण बंद!
तळा तालुका रास्त भाव धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी शासकीय बायोमेट्रिक नुसार धान्य उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार तळा यांना निवेदन रास्तभाव धान्य दुकानदार तालुका अध्यक्ष जनार्दन (बबन)भौड, सेक्रेटरी रमेश कोलवणकर यांनी संघटनेच्या वतीने सादर केले. राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव वाढत असून संक्रमण रोखण्यासाठी शासन कडक निर्बंध लावून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच शासकीय आदेशाचे पालन करावे लागत असूनहि शिधापत्रिका धारकाचा थंम्स (अंगठा)ई पॉज मशीन वर सातत्याने घ्यावा लागतो. त्यामुळे संपर्क वाढत असल्याने काळजी घेऊन दुकानराला किंवा मापाडी कर्मचाऱ्याला कोरोना होण्याची शक्यतानाकारता येत नाही. तरी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदाराच्या व लाभार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी दुकानदाराचे स्वतःचे अंगठे आधारकार्ड अधि-प्रमाणित करूनच धान्य वितरण करण्याची परवानगी द्यावी. तसे परिपत्रक देण्यात यावे अन्यथा राज्य संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होऊन धान्य चलन भरणा व वितरण करण्यात येणार नाही. मागील एक वर्षाच्या कठीण काळात कोरोना योध्दा समजून शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व नागरिकांना धान्य वाटप करून कोणाही वंचित ठेवण्यात आले नाही. त्यानंतर ई पॉज मशीन वर थम्स घेण्यात येऊ नये अशी परवानगी देण्यात आली होती आता पुन्हा ई पॉझ मशीनवर धान्य वितरण करण्यात यावे. असे आदेश असून वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षीततेच्या दृष्टीने शिथील करण्यात यावे अशी प्रामुख्याने मागणी आहे. जो पर्यंत संपूर्ण राज्यात शासन आमची जबाबदारी व काळजी घेत नाही व स्वःताचे आधार अधीप्रमाणीत करून धान्य वितरण करण्याची परवानगी देत नाही. तोपर्यंत धान्य वितरण करण्यात येणार नाही. तरी १ मे २०२१ पासून रेशनिंग धान्य बंद केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.