रोहा येथे २८ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या
रोहा (समीर बामुगडे) : रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसे येथील वर्धमान रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या विशाल धनराज पाटील (वय २८) याने स्वतःच्या राहत्या घरामध्ये एकटा असताना पंखा लावण्याच्या हुकाला रस्सी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजि. नं. २०/२००२, सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी. एस. राऊत हे पुढील तपास करीत आहेत.