कोरोना काळात सामाजिक बांधीलकीसाठी तळेकर सरसावले

तळा (संजय रिकामे) : संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून  देशातील १३० कोटी लोकसंख्या असलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन, रेमडेसिवीर रोगप्रतिकारक लस शासकीय खाजगी दवाखान्यात दिली जात असून लस घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या वारी प्रचंड गर्दी होत असल्याचे लक्षात येऊन विराज केबल नेट वर्कचे मालक विराट टिळक यांनी व्हि.सी.एन नेटवर्क ग्रुप द्वारे आवाहन करून सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, राजकीय कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत येणाऱ्यानागरिकांना बसण्यासाठी खुर्च्याची मदत केली. तर या काळात कोरोना बाधित रूग्णाला आँक्सिजन ची कमतरता पडू नये म्हणून हिरवळ प्रतिष्ठान महाड, आपलं कोकण मराठी न्युज चॅनल, विराज केबल नेटवर्क व रायगड टाईम्स यांच्या सौजन्याने ऑक्सिजन सिलेंडरसह किटची व्यवस्था देखील केली आहे. तर काही जणांनी पाण्याची गरज ओळखून पाणी बाॅटलची व्यवस्था केली तर नागरिकांना बसायला जागा अपूर्ण आहे ओळखून मंडप बांधण्यासाठी अॅड. उत्तम जाधव यांनी रोख रक्कम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल बिरवाटकर यांच्याकडे सुपूर्त केली. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपून अशा राष्ट्रीय सामाजिक उपक्रमासाठी उत्स्फुर्त सहभाग घेऊन गाव करील ते राव काय करील असा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. यामधून समाजकारण काय आणी कसे करावे असा संदेश पोहोचला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सामाजिक कार्यांचे सर्व स्थरावर कौतुक केले जात आहे.

Popular posts from this blog