ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

जागतिक महिला दिनानिमित्त मालसईच्या युवतींचा अनोखा उपक्रम 

पूर्वसंध्येला राबविली ग्राम स्वच्छता मोहिम

रोहा (रविना मालुसरे) : दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक महिला दिना निमित्ताने महिलांच्या सन्मानाचे अनेक कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले जातात. मात्र या उपक्रमांव्यतिरिक्तही आपण आपल्या गावची स्वच्छता करून हा दिन अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो, असा सर्जनशील विचार मालसईच्या युवतींच्या मनात आला. आपण समाजोपयोगी काही करावे या भावनेतून सदोदित संघटितरित्या काही कल्पक कार्यक्रम राबविणाऱ्या, मालसईच्या युवतींनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ग्राम स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी केली.

गावाकडून पुरातन व जागृत महादेव मंदिराकडे जाणारी दुर्लक्षित पायवाट ही यानिमित्ताने स्वच्छ करून घेतली. लवकरच महाशिवरात्री निमित्ताने अनेक भाविक ह्याच पायवाटेने श्री महादेवाच्या दर्शनासाठी येणार, त्यांचा मार्ग सुकर व्हावा हा यामागचा हेतू!

मालसईच्या या युवतींनी राबविलेला हा ग्रामस्वच्छतेचा उपक्रम म्हणजे संवेदनक्षमतेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

जागतिक महिलादिना निमित्ताने मालसईच्या युवतींनी राबवलेल्या ह्या स्वच्छता मोहिमेबद्दल ग्रामस्थ व परिसरांतील नागरिकांनी युवतींचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog