🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रायगड जिल्हा परिषद शाळा मालसई येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा

रोहा (रविना मालुसरे) : जागतिक महिला दिनानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा मालसई, ता. रोहा येथे गावातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. 

ग्रुप ग्रामपंचायत मालसई येथील नवनियुक्त सरपंच सौ. रसिका हेमंत मालुसरे, ग्रुप ग्रामपंचायत सदस्या सौ. उस्मिता अनिल आयरे, जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी तथा पत्रकार कु. रविना नारायण मालुसरे, अंगणवाडी मदतनीस सौ. भारती एकनाथ मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता सुधीर चाळके, शालेय पोषण आहार स्वयंपाकी सौ. नम्रता नथुराम तेलंगे व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता नथुराम शिंदे यांना शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी श्री. दिपक रघूनाथ मांडलुस्कर व निवडक महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक श्री. अरुण आगळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog