उसरखुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला खिंडार, चरई बुद्रुक ग्रामस्थांचा सेनेत प्रवेश
विकास केवळ पुढाऱ्यांचा, गाव फक्त सतरंज्या उचलण्यासाठी ग्रामस्थांनी व्यक्त केली व्यथा!
तळा (संजय रिकामे) : तालुक्यातील चरई बुद्रुक हे गाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्षे या गावावर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती असूनही अपेक्षित विकासकामे न झाल्याने गावातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक देखील राष्ट्रवादीवर नाराज असल्याने शिवजयंतीच्या पुर्व संध्येला चरईबुद्रुक ग्रामस्थांनी शिवजयंतीचे मुहूर्तावर असंख्य युवकांनी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी जिल्हा महीला संघटक प्रतिभाताई करंजे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ, शहरप्रमुख राकेश शेट वडके, उपतालुका प्रमुख शरद सारगे, अशोक राणे, नानादळवी नमीत पांढरकामे, लिलाधर खातू,सिराज खाचे गुरूदास तळकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजपर्यंत आम्ही एक मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडा खांद्यावर घेऊन होतो पंरतु पक्षाने विकास करताना अंधारात ठेवले विकास होत गेला तो मोठ्या पुढारयाचा गाव मात्र सतरंंज्या उचलत राहिले. सद्यस्थितीत महाआघाडीची सत्ता असून शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, उप तालुका प्रमुख शरद सारगे, शहरप्रमुख राकेश वडके यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर होत असून भविष्यात देखील होणार असल्याचा विश्वास असून कार्यप्रणालीवर प्रेरीत होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख नवगणे यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या भागातील उपेक्षित विकास असेल तो आम्हांला सांगा, निश्चितच मी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पुर्ण करीन असे सांगितले. महाआघाडीची सत्ता असली तरी मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत त्यामुळे कोणालाही घाबरण्याचे काम नाही. कामे सुचवा, ती पुर्ण केली जातील. आपल्या प्रवेशामुळे निश्चितच ताकद वाढली आहे. विकास करणार असल्याचा विश्वास दिला. जिल्हा महिला संघटक सुवर्णा करंजे यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी अहोरात्र काम करीत आहेत. कोविड महामारी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असून माझ्या सामान्य नगरसेविका प्रयत्न करीत असून आपल्या भागातील या काळातील पेशंट असो नसो कधीही औपधोपचारासाठी अॅडमीट होण्यास अडचण असेल तर कळवा, सोयीनुसार औषधोपचार मिळून देण्यासाठी तत्पर आहे. तालुका स्तरावर पक्षाचे काम व्यवस्थित चालूअसल्याने समाधान व्यक्त करून पक्ष प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले. चरई बुद्रुक येथील ४०-४५ ग्रामस्थांनी घडाळ्याची संगत सोडत सेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला आहे.