माणगांव उपजिल्हा रुग्णालय येथे स्मार्ट क्युअर अत्याधुनिक मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न
माणगाव (उत्तम तांबे) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एचडीएफसी बँकेच्या सौजन्याने माणगांव उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेल्या स्मार्ट क्युअर अत्याधुनिक मशीनचे उद्घाटन कार्यतत्पर माणगांवच्या विकासासाठी कटिबद्ध रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा लोकार्पण सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी माणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक मनोहर मेथा यांची या मशीन द्वारे प्राथमिक चाचणी काढण्यात आली .या स्मार्ट क्यूअर क्लाऊड हेल्थ किऑक्स मशीन द्वारे एकाच वेळी पन्नास तपासण्या केल्या जात आहेत. किमान मानवी हस्तक्षेप व त्वरित रिपोर्ट व्हिडिओ कॉनफरसिंग द्वारे डॉक्टरांशी संवाद साधून स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून त्वरित औषधे तसेच स्थानिक भाषांमध्ये उपलब्धता हे विशेष मशीनचे वैशिष्ट्य असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय साठी अत्यंत उपयुक्त चाचण्या एकाच वेळी होऊन रिपोर्ट लगेच समजणार आहे या मशीनचा लाभ रुग्णांना उत्तम प्रकारे मिळणार असल्याने खासदार सुनील तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या जिल्हा रुग्णालयाला भलामोठा ऑक्सिजन सिलेंडर लाभला आहे त्याचा उपयोग वर्षांनो वर्ष तसाच भरलेला राबवा असे डॉक्टरांना सांगून निर्माण झालेली ही सुविधा लोकांसाठी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून या मशिनद्वारे रुग्णांचे योग्य निदान करून सेवा करण्याचे काम आजपासूनच सुरु करा अशी विनंती वजा सूचना खा. सुनील तटकरे यांनी डॉक्टरांना देऊन अत्याधुनिक कार्यवाही ॲम्बुलन्स हे माणगांव तालुक्यासाठी आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी प्रस्तुती साठी येणाऱ्या महिला भगिनींची नैसर्गिक प्रस्तुती झाली पाहिजे सिजरिंग साठी तिने इतर ठिकाणी कुठेही जाऊ नये याची दक्षता घ्यावी जसे की प्रसुतीमार्फत तिच्या पोटी येणारे बाळ व ती सुखरूप राहून त्यांना उत्तम पद्धतीने आयुष्य लाभो अशा भावना देखील खा. तटकरेंनी व्यक्त केल्या. या लकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपजिल्हा माणगाव वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, शिवसेना युवा नेते राजीव साबळे, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, रत्नाकर उभारे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, तसेच आरोग्य कर्मचारी व माणगांवकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.