मी मराठी लाईव्ह वृत्त वाहीनी लवकरच आपल्या भेटीला

मान्यवरांच्या उपस्थित रंगला उद्घाटन सोहळा

बोर्लीपंचतन (मुज्जफर अलवारे) : प्रेरणाज मीडिया अँड मास कमुनिकेशन व एइओएन कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "मी मराठी लाईव्ह" वाहिनी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या वहिनीचा उद्घाटन सोहळा शनिवार दि.२७ मार्च रोजी सा. ७ वा. एन एस सी आय क्लब वरळी येथे पार पडला. या वाहिनीचे उद्घाटन काँग्रेसचे वरिष्ठ नेते मधुकांत शुक्ला, राज्य मेडिकल विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी अभिनेता हार्दिक जोशी, डॉ. वानु विजय नाईक यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.

"मी मराठी लाईव्ह" ही वाहिनी आय पी टी व्ही (IPTV) व ओ टी टी (OTT) माध्यमातून देश भातातील प्रेक्षकांना पाहता येवू शकेल AEON या कंपनीने संपूर्ण देशभरात अँड्राईड बॉक्स चे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. या बॉक्सवर मी मराठी लाईव्ह वाहिनी प्रेक्षकांना २४ तास पाहता येईल असे प्रेरणाज मिडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कडाळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

त्याच बरोबर ॲप, पोर्टल व यू ट्यूबवर मी मराठी लाईव्ह पाहता येवू शकेल अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

मराठी भाषेत विविध वाहिन्या बातमी पत्र प्रसारित करतात आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली चुकीचा प्रसार करीत असल्याची खंत डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला मास्क घालावेच लागेल तरच तुम्ही स्वतःला कोरोनापासून बचाव करू शकता असा सल्लाही लहाने यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्याचे देशाकरिता मोठे योगदान असल्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते मधूकांत शुक्ला यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषेत पहिली ऑनलाईन न्यूज एजन्सी सुरू केल्याचे सांगतानाच मी मराठी लाईव्ह मराठी वाहिनीला आपल्याकडून सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात हार्दिक जोशी(राणादा),डॉ. वाणू,पालघरचे सामाजिक कार्यकर्ते श्री नाईक व आपली माय मराठी चे संचालक जॉन सगुण सावंत,मयूर प्रिंटर चे मालक व सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या तर,व्यवसाय क्षेत्रात व कोरोनाचा आजार पसरत असताना ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्यातील डिजिटल कनेक्सट चे संचालक प्रसाद विश्वकर्मा वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत वाघमारे,अॕड. अमोल पाटील, जे जे चे डॉ.मधुकर गायकवाड,सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.खोब्रागडे,जल अभियंता जीवन पाटील,महिलांच्या सक्षमकरणासाठी योगदान देणाऱ्या डॉ. प्रिया शेंडे,ऑटो आय केअर गोल्ड स्पॉन्सर यांना सन्मान चिन्ह व तुळशीचे रोपटे देवून सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी मराठी.लाईव्ह चे संचालक मंडळ महेश जोशी,नरेश शिंदे,नरेंद्र खेतान, मेहुल शाह,निमेश सचदे,अविनाश पवार,शरद कडाळे,दीप्ती वालावलकर,उमेश गायगावळे,श्वेता पवार,श्रध्दा शिर्के,सगुण सावंत,रमेश साळुंके,उदय कासारे यांनी महत्वाची भूमिका बजावली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आणि संतोष वैद्य यांनी केले होते.

Popular posts from this blog