रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु! 

कोलाडमध्ये मटका माफीयांना पोलीस ठोकतात सलाम!

येथे मटका माफियांकडून पोलीसांना पोहोचतोय दरमहा ५० हजारांचा हफ्ता?

रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्हा हा अतिसंवेदनशीलतेकडे झुकताना दिसत आहे, चोऱ्या, दरोडे, खुन, बलात्कार अशा विविध गुन्ह्यांनी हा जिल्हा त्रस्त झालेला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाचे अपशय म्हणायचे का? कुणीही उठावे काहीही करावे अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. 

कोलाड मध्ये मटका माफियानी आर.डी.सी.सी. बँकेच्या परिसरात कौलारू चाळीत धुडगूस सुरु असून या जागेवर जाऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे येथील मटका माफीयांकडून कोलाड पोलीसांना दरमहा ५० हजारांचा हफ्ता सुरू असल्याची चर्चा आहे! त्यामुळे येथील स्थानिक पोलीस हे मटका माफीयांचे 'रक्षणकर्ते' बनून राहिले आहेत. 

वाळू माफिया, माती माफिया, यानंतर कॉरी माफियांचा धुडगूस सुरु असून त्यांनी लावलेल्या विवीध ठिकाणच्या डोंगर दऱ्यांतील सुरुंग स्फोटाचे आवाज जिल्ह्यामध्ये उमटत आहेत आणि नेमके हे आवाज प्रशासनातील संबंधित खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत का पोहचत नाहीत की यानी जाणुन बुजून त्यांनी (स्वतःचा खिसा भरून) कानावर हात ठेवले आहेत, याचा विचार शासनाने केला पाहिजे मोठे मोठे डोंगर भुईसपाट केले जात आहेत. मातीचे अवैध उत्खनन सुरु आहे. अजूनही वाळूचा उपसा कुठे ना कुठे सुरु आहे. नदी पात्रात कुठलीही परवानगी न घेता टँकर मालक पाण्याचा अवैध उपसा करत आहेत अशी सर्वत्र परिस्थिती असताना दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्ती चोरी प्रकरणानंतर जिल्ह्यात बंद व थंड पडलेले मटका यांनी पुन्हा डोके वर काढून नव्या जोमाने काळे धंदे जोरात सुरु केले आहे. तर या काळ्या धंद्याच्या दुष्परिणामामुळे जनतेला रोज नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही काळ्या धंद्याची जिल्ह्याला लागलेली कीड आपल्या अधिकार व कारवाईच्या फवारणीने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नष्ट करतील का? असा प्रश्नचिन्ह नागरिकांसमोर उभा आहे!

Comments

Popular posts from this blog