ढालघर फाटा येथील बेकायदा जुगार क्लबवर पोलीसांचा वरदहस्त! 

जुगार क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने बंद करावा : नागरिकांची मागणी

रायगड (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे पोलीसांच्या आशिर्वादाने अवैध जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीसांनी या अवैध धंद्याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष केलेले असून हा जुगार क्लब जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक व महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

पोलीसांना पोलीस दलाकडून मिळणाऱ्या कमी पगारातून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने येथील पोलीसांनी आर्थिक मदतीकरिता जुगार क्लबचा आधार घेतलेला आहे. परिणामी गृहमंत्री व पोलीस अधीक्षक यांनी येथील पोलीसांच्या या समस्येची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. एक तर येथील जुगार क्लब कायमचा बंद करावा किंवा येथील पोलीसांचा पगार दुप्पट वाढविण्यात यावा! जर असे केले तरच येथील पोलीसांची आर्थिक समस्या दूर होईल, असे काही सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे!

दरम्यान, ढालघर फाटा येथील जुगार क्लबमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील महिला वर्गामध्ये पोलीसांविरूद्ध संतापाची लाट पसरलेली असून बेकायदा जुगार क्लबला साथ देणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी येथील नागरीक व महिला वर्गाकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog