ढालघर फाटा येथे अवैध जुगार क्लब सुरू, पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता? 

प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी

रायगड (प्रतिनिधी) :  माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे पोलीसांच्या आशिर्वादाने अवैध जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीसांनी या अवैध धंद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने 'पोलीस' हा एक महत्वाचा घटक समजला जातो. जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडते तेव्हा-तेव्हा रक्षणासाठी पोलीसांकडेच धाव घेत असते. म्हणूनच पोलीसांना 'जनतेचे रक्षक' असे म्हटले जाते! परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच गुन्हेगारांना साथ देत असतील तर..???? हा 'कुंपणाने शेत खाण्याचा' प्रकार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! कारण येथील पोलीस हे जुगार क्लबचालकांच्या ताटाखालचे मांजर बनलेले आहेत. त्यामुळे येथील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. हे अवैध धंदे कधी बंद होणार? हा प्रश्न आज देखील गुलदस्त्यातच आहे! येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. येथे मोगलाईचे राज्य आल्याचा आरोप काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Popular posts from this blog