ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोहा तालुक्यात बेसुमार माती उत्खनन सुरु

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळतेय 'चहा-पाणी?'
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील नैसर्गिक डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून डोंगर पोखरुन बेसुमार माती उत्खनन सुरु आहे. मात्र तक्रारी करूनही महसूल विभागाचे याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण खुळे यांनी केला आहे. नैसर्गिक डोंगर अनधिकृतपणे पोखरुन माती उत्खनन करण्याची जणु भू-माफियांमध्ये स्पर्धा रोहामध्ये सुरु झाली आहे. रोहा तालुक्यातील किल्ला, नागोठणे, खारी, वरसे, धाटाव या ठिकाणी युध्दपातळीवर माती भराव चालू आहेत. 
माती माफीयांनी डोंगर पोखरण्याची मोहिम सुरु केली असुन यामुळे भविष्यात तालुक्यातील मोठ्या रहिवासी भागाला धोक्यात टाकण्याचे काम सुरु आहे. जेसीबी , बुलडोझर, इत्यादी यांत्रिकी सामुग्री वापरुन रहिवासी भागाला लागुन असलेला वराठी डोंगर पोखरण्याची मोहिम जोरदार सुरु आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तर मालसई विभागात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. याची माहिती महसुल विभागाला असतानाही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे चित्र रोहा तालुक्यात पाहावयास मिळत आहे. आगामी काही दिवसांत हे बेकायदेशीर उद्योग बंद झाले नाहीत, तर रोहा महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध शासनाने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील जनतेतून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog