🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे आवाहन 

माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव पोलीस ठाणे हद्दीत माणगांव नगरपंचायत हद्दीतील बामणोली रोड माणगांव परिसरात कोमिस्को कॉम्प्लेक्स, सद्गुरू अपार्टमेंट व नव्याने उभे राहणाऱ्या कोंडविलकर हाईट्स पसरीसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माणगांव पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे व गोपनीय विभागाचे अंमलदार शाम शिंदे व पो. ह. मिलिंद खिरीट यांनी घटनास्थळी धाव घेतली व बामणोली रोडच्या बाजूस व टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या परिसरात सुमारे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. सदर इसमाला रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले ११ मार्च रोजी दुपारी २:४५ च्या सुमारास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माणगाव पोलीस ठाण्यात अ.मृ.र.नं. ०८/२०२१, सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून सदर मयत व्यक्तीचे नातेवाईक किंवा व्यक्ती कुणास ओळखीची वाटल्यास माणगाव पोलीस ठाणे फोन नंबर-०२१४०-२६३००५ इथे संपर्क साधून कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog