ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

अलिबागमध्ये 'श्री बापदेव लाईन बॉईज मित्र मंडळा'च्या वतीने सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू

 १५ वा साखरचौथ गणेशोत्सव सोहळा 

अलिबाग, दि. २९ (प्रतिनिधी) :- अलिबाग येथील प्रसिद्ध 'श्री बापदेव लाईन बॉईज मित्र मंडळ' यांच्या वतीने यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करत 'लाईन बॉईजचा राजा' सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सव २०२६ मोठ्या भक्तीभावात आणि जल्लोषात सुरू आहे. सन २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाच्या वतीने आयोजित हा त्रिदिवसीय गणेशोत्सव सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होत असून सध्या या महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवाची सुरुवात सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लाडक्या बाप्पाच्या वाजतगाजत आगमन सोहळ्याने अत्यंत उत्साही वातावरणात झाली आहे.  
महोत्सवांतर्गत आज मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची भव्य महापूजा संपन्न झाली आहे. सध्या या महोत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून सायंकाळच्या सत्रातील कार्यक्रमांची लगबग मंडळाच्या वतीने सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता 'संगीत साधना भजनी मंडळ अलिबाग' यांच्या सुरेल भजनाचा कार्यक्रम रंगणार असून, त्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाआरती आणि सायंकाळी सव्वा सात वाजता भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या सांगता दिनी म्हणजेच बुधवार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पारंपरिक वाद्यांच्या आणि गुलालाच्या उधळणीत 'लाईन बॉईजच्या राजा'ची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.  
​या संपूर्ण महोत्सवाचे नेटके आणि यशस्वी नियोजन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश महाडिक, उपाध्यक्ष श्री. प्रदिप म्हात्रे, सल्लागार श्री. अमोल चाळके, सचिव श्री. पंकज झाडेकर तसेच सदस्य श्री. प्रणित पाटील, श्री. अनिकेत साळुंखे आणि श्री. निलेश जाधव हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तळमळीने परिश्रम घेत आहेत. याशिवाय मंडळाचे आधारस्तंभ श्री. सुरेश महाडीक, श्री. व्यंकट जाधव, श्री. प्रकाश देसाई, श्री. देवराम म्हात्रे, श्री. अशोक जाधव आणि श्री. अंबू राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन या महोत्सवाला लाभत आहे. सध्या सुरू असलेल्या या सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सवात अलिबाग परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सहपरिवार व मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घ्यावे तसेच तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त श्री बापदेव लाईन बॉईज मित्र मंडळ, अलिबाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog