फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन 

तळा (संजय रिकामे) : उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. 01 मार्च ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यात फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या फिरते लोक अदालतीचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. 1 मार्च रोजी सकाळी रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. विभा प्र. इंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवृत्त दिवाणी न्यायाधीश, सांगली, श्रीकांत उपाध्ये, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, एस .डी. घनवट, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रविण ठाकूर हे उपस्थित होते.

Popular posts from this blog