रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पेण येथे नेत्र तपासणी शिबीर
पेण (प्रतिनिधी) : अपघातांना आळा बसावा यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत पेण - रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केअर सेंटर येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामधे १०० पेक्षा अधिक रिक्षाचालकांची आणि वाहतूक पोलीसांची नेत्रतपासणी करण्यात आली व वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.