राष्ट्रीय स्पर्धेत आर्यन अरूण पाटील यास सुवर्णपदक
तळा (संजय रिकामे) : छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत अठरा वर्षे वयोगटातील उंचउडी खेळ प्रकारात पिल्ले महाविद्यालय रसायनी येथील विद्यार्थी कु. आर्यन अरुण पाटील सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे हे गाव अर्णव पाटील याचे मुळ गाव असून त्याचे वडील नोकरी निमित्ताने माणगांव येथील अमित काॅप्लेस येथे वास्तव्यास आहेत.आर्यन यास छत्तीसगड येथील समारंभात मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. अजुन बरेच यश मिळवुन रायगड जिल्हाचे नाव उज्ज्वल करण्याचा मानस आर्यनचा आहे. रायगड जिल्ह्याला कौतुक आणि अभिमान वाटेल, असे यश असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातुन व्यक्त होत आहेत. कु. आर्यन अरुण पाटील सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला त्याबद्दल त्याचे अमित काॅप्लेक्स रहिवाशी मंडळ माणगांव यांनी विशेष अभिनंदन केले आहे.