ओबीसी संघर्ष समन्वय समिती रोहा तालुका अध्यक्षपदी सुरेश मगर, तर सरचिटणीसपदी महादेव सरसंबे यांची निवड

रायगड (भिवा पवार) : ओबीसी समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी संघर्ष समिती संलग्न ओबीसी जनमोर्चाची बैठक रोहा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समिती रोहा तालुकाध्यक्ष पदावर सुरेश मगर यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी महादेव सरसंबे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीस कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक उदय कठे, सुरेश मगर, संतोष खटावकर, शिवराम महाबळे, डॉ. मंगेश सानप, दत्ताराम झोलगे, अनंत थिटे, महेश बामुगडे, सुहास खरीवले, सतीश भगत, काशिनाथ धाटावकर, महादेव सरसंबे, अनंत जंगम, चंद्रकांत भगत, अरविंद मगर, सचिन भगत, मंगेश रावकर, महेंद्र सुटे, रामचंद्र निजामकर, मनोज सुर्वे, गणेश सानप आदी उपस्थित होते.

यावेळी शंकरराव म्हसकर यांनी ओबीसी समाजाने एकत्रित येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. परंतु शासन दरबारी ओबीसी समाज मोठ्या संख्येने दिसत नसल्याने ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही. त्यासाठी ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे शंकरराव म्हसकर यांनी सांगितले.

यावेळी उदय कठे यांनी रायगड जिल्ह्यात ओबीसी समाजाची संघटना मजबूत करण्यासाठी सर्व समाजाचे प्रतिनिधित्व या संघटनेत येण्याची गरज आहे. यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेतल्यास ओबीसी समाज बळकट होईल असे सांगितले.

यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समिती सलंग्न ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले. यामध्ये रोहा तालुका अध्यक्ष सुरेश मगर, उपाध्यक्ष अनंत थिटे, रामचंद्र म्हात्रे, अमोल पेणकर, उत्तम नाईक, सरचिटणीस महादेव सरसंबे, चिटणीस मंगेश रावकर, महेश बामुगडे, संदीप चोरगे, नामदेव सुतार, खजिनदार दत्ताराम झोलगे, प्रसिद्धी प्रमुख उदय मोरे, सल्लागार काशिनाथ धाटावकर, अनंत जंगम, हरीचंद्र वाजंत्री, जिल्हा कार्यकारणी सदस्य शंकरराव म्हसकर, शिवराम शिंदे, शिवराम महाबळे, मधुकर पाटील, संतोष खटावकर, तालुका कार्यकारणी सदस्य सुहास खरीवले, प्रफुल्ल पडवळ आदींची निवड करण्यात आली.

रोहा तालुका संपर्क प्रमुख म्हणून रोहिदास दुसार, डॉ. सागर सानप, डॉ. मंगेश सानप, महेश शिर्के, किरण डिके, अॅडवोकेट मंगेश हुमणे, माधव आग्री, अशोक करंजे यांची निवड करण्यात आले आहे.

ओबीसी संघर्ष समन्वय समिती सलग्न ओबीसी जनमोर्चाची रायगड जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी चालू आहे. याची सुरुवात रोहा तालुक्यातुन झाली असून रोहा तालुक्याची कार्यकारणी रविवारी निवडण्यात आले आहे. ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष प्रकाश शेंडगे व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाची संघटना मजबूत करणार असल्याचे सुरेश मगर यांनी यावेळी सांगितले.

Popular posts from this blog