अन्शुल लिमिटेड व सुदर्शन केमिकल कंपनीकडून द. ग. तटकरे विद्यालयाला वाॅटर कुलर व सॅनिटाइजर वेंडिग मशीन
रोहा (सदानंद तांडेल) : अन्शुल लिमिटेड व सुदर्शन केमिकल कंपनी कडून द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काेलाड यांना वाॅटर कुलर व सॅनिटाइजर वेंडिग मशीन भेट देण्यात आली. विद्यालयत जवळ-जवळ दाेन हजार विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या सर्वांची शुद्ध पाण्याची गरज यामुळे पूर्ण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय राजिवले व प्राचार्य शिरिष येरुणकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.
यावेळी अन्शुल लिमिटेड चे जनरल मॅनेजर श्री. शिट्याळकर एच. आर., श्री. भाेकटे, सुदर्शन कंपनी चे व्हाईस प्रेसिडेंट श्री. विवेक गर्ग, श्री. विशाल घाेरपडे, श्री. आकाश वर्मा उपस्थित होते. यावेळी सौ. जयश्री खाेडे, श्री. गणेश घाेणे व सौ. सिल्वेष्ट्रा बारदेशकर यांनी विद्यालयाने आजपर्यंत शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात केलेल्या अप्रतिम कामगिरीचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांनी निर्माण केलेली भव्य इमारत व सुसज्ज मैदान यामुळे हे सर्व शक्य झाले आहे हे प्राचार्य शिरिष येरुणकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी स्वागतगीत सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.