दिघी सागरी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न
बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. महेंद्र शेलार यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली असुन बढतीनंतर त्यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार येथे नियुक्ती झाली असून लवकरच ते तेथील पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्विकारतील. त्यांचा निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिघी सागरी पोलीस ठाण्यात कोरोना संसर्गाचे नियम पाळून आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ऊपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, बोर्लीपंचतन येथे २००५ रोजी उसळलेल्या दंगलीतून या पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्याचे समजते. परंतु मी येथील पदभार स्विकारल्यापासून येथे कोणताही जातीभेद व धर्मभेद मला जाणवला नाही. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने व एकमेकांच्या अडीअडचणीत मदतीला धावत असतात. इथे गुन्हेगारीसुध्दा खूप कमी आहे. सर्वपक्षीय स्थानिक पुढारी, स्थानिक प्रशासन, पत्रकार व नागरीक यांचे कोरोना काळतील टाळेबंदीमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने कर्तव्य बजावीत असताना मोलाचे योगदान लाभले.
साई बौद्ध विकास मंडळाच्या उपोषणाला यश; अनाधिकृत बांधकाम तोडण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही माणगांव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुक्यातील साई बौद्धवाडी येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत अंगणवाडी करता बांधकाम करण्यात आले होते. १८ जानेवारी २०२४ रोजी सदर अनाधिकृत बांधकामाला सुरुवात केली असता त्यावेळी तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विचारपूस करिता गेले असता साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकावले होते या प्रकाराबाबत माणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी न्याय मागण्याकरिता तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत अंगणवाडी संबंधित कार्यालयाला तक्रार पत्र सादर केले होते. सदरची अंगणवाडी बांधण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव नसताना सदर बांधकामाबाबत निविदा जाहीर न करता, जागेबाबत सहमती न घेता सदर ठेकेदारांनी अंगणवाडी बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थ निवेदन ...