ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अज्ञात वाहनाच्या धडकेने टुव्हीलर स्वार जागीच ठार, खांब गावानजीक दुर्दैवी घटना 

रायगड (भिवा पवार) : मुंबई-गोवा महामार्गावरील खांब गावानाजीक सोमवार दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे टुव्हीलर स्वारचे जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलूस ठाण्यापासून ७ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवरील खांब गावाच्या हद्दीत रोहित धनवी यांच्या टपरी जवळ पोटकालव्याच्या मोरीलगत कोलाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या ऍक्टिव्हा गाडी क्र. एम.एच. ४६ ऐ. के. ४२५२  टुव्हीलर स्वार अकबरअली अहमद कुमार (वय ५५) रा. बारापाडा, ता. पनवेल, जि. रायगड याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे टुव्हीलर स्वार याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असून याविषयी कोलाड पोलीस ठाणे येथे  गुन्हा रजि. नं. ६/२०२१, भा.दं.वि. कलम ३०४(अ), २७९, ३३८ मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरक्षक एस. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog