रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागोठणे येथे नेत्र तपासणी शिबीर


नागोठणे (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत नागोठणे पोलीस ठाणे, लायन्स क्लब नागोठणे व जिल्हा वाहतूक शाखा नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. 


यावेळी रिक्षा मिनीडोअर रिक्षांसाठी रेडीयमच्या पिवळ्या पट्ट्या देण्यात आल्या व मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या संधीचा ५५ रिक्षा चालक-मालक यांनी लाभ घेतला.

 

याप्रसंगी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री. दादासाहेब घुटूकडे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक श्री. परशुराम भोईर, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार गणेश पवार, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, विजय पाटील, पोलीस नाईक जीवन आवळे, अनिश शिर्के, संजय झगडे, तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद कदम, निलेश महाडीक, तसेच मोफत डोळे तपासणी शिबीरासाठी दृष्टी ऑप्टीक्सचे मालक जयेश घासे व त्यांची टिम यांच्यासह लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संदिप नायर, उपाध्यक्ष लायन संतोष झोलगे, सेक्रेटरी एमजेएफ लायन विवेक सुभेकर, ट्रेझरर लायन संतोष शहासने, डायरेक्टर लायन दौलत मोदी, डायरेक्टर लायन सुजाता जवके, लायन सुजित महागावकर, लायन अनिल गिते तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Popular posts from this blog