रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्हा वाहतूक शाखेतर्फे नेत्र तपासणी शिबीर


रायगड (प्रतिनिधी) : ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंदाल हॉस्पिटलच्या सहकार्याने व जिल्हा वाहतूक शाखा नागोठणे आणि महामार्ग पोलीस केंद्र वाकण यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अंतर्गत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. 

यावेळी वाहतुक शाखेचे सहाय्यक फौजदार गणेश पवार, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, कॉन्स्टेबल विजय पाटील, अनिस शिर्के, संदीप झगडे इत्यादी वाहतूक पोलीस उपस्थित होते. या शिबिरामधे सुमारे ५५ वाहनचालकांची नेत्रतपासणी करण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Popular posts from this blog