ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी भानंग ग्रामपंचायतीचे योगदान

भानंग येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न


तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील भानंग ग्रामपंचायतीत वसुंधरा सामाजिक  कौशल्य विकास संस्था (कोल्हापूर) आणि भानंग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भानंग गावामध्ये तीन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधी मध्ये संपन्न झाले.या कार्यक्रमाची सांगता दि.(13) फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दिव्यांग संघटनेचे तळा तालुका अध्यक्ष किशोर पितळे, तळा तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय रिकामे उपस्थित होते त्याचबरोबर भानंग ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ वाघरे, सचिव श्री. सोनटक्के,तंटामुक्त माजी अध्यक्ष कृष्णा काप, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण काते, सौ. सुलोचना रेवाळे, कानु विचारे, सुरेश पवार, संतोष वाघरे, यशवंत वाघरे, वसुंधरा सामाजिक  कौशल्य विकास संस्था (कोल्हापूर) चे अध्यक्ष मानशिग सावरे, श्रीमती पाशीलकर, श्रीमती कदम भानंग ग्रामपंचायतीतील हद्दीतील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणाचे प्रमुख उदिष्ट ग्रामीण भागातील गरीब, निराधार, गरजु तसेच कष्टकरी महीलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सबलिकरण करुन त्यांना सक्षम करणे, महिलांना गरिबीतुन बाहेर येण्यासाठी आवश्यक सहाय्यता देणे, ग्रामीण भागातील गरिब महीलांना एकत्रित करुन त्यांना स्वयंसहाय्यता गटांमध्ये सहभाग करुन त्यांच्या संस्थेची क्षमतावृध्दी कौशल्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने मसाला बनविण्याचे प्रशिक्षण वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था कोल्हापूर या संस्थेकडून दोन दिवस देण्यात आले. गरम मसाला, दुध मसाला, शेंगदाणे लसणाची चटणी सर्व तिखट मसाले एकूण पंचवीस विवीध प्रकारच्या मसाल्यांचे प्रशिक्षण यावेेळी देण्यात आले.

मुलींच्या जन्माचे स्वागत

तिसऱ्या दिवशी मुलींच्या जन्माचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. ज्या मातेने मुलींना जन्म दिला त्या मातेचा सत्कार यावेळी करण्यात आला. मुलीचा जन्म हा नैसर्गिक असून स्त्रीभ्रुण हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला. मुलगी जन्माला आल्यानंतर तीचे महत्व बोधगीताने करण्यात आले. मुलीचे प्रत्येकाच्या कुटूंबातील महत्व यावेळी सांगण्यात आले. मुलीला जन्म देणारया मातेला साडी चोळीचे वाटप या कार्यक्रमाच्या निमीत्ताने करण्यात आले. 

दिव्यांग व्यक्तींना अनुदान वाटप

भानंग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना अनुदान वाटप यावेळी करण्यात आले. दिव्यांग व्यक्ती जरी काही कारणाने सर्व सामान्य व्यक्तींसारखी वावरत नसली तरी आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या जीवनाचा उत्कर्ष करु शकते त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन भानंग ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधव आणि भगीनींना भानंग ग्रामपंचायतीच्या वतीने अनुदान वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन दिव्यांग तळा तालुका अध्यक्ष किशोर पितळे यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भानंग ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ वाघरे, सचिव श्री. सोनटक्के, ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना तसेच दिव्यांग बांधवांना  प्रमाणपत्राचे व अनुदानाचे वाटप भानंग ग्रामपंचायत सरपंच रघुनाथ वाघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Popular posts from this blog