🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत माणगांव वाहतूक पोलीसांतर्फे वाहनचालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल येलवे, पोलीस नाईक अक्षय जाधव, रावसाहेब कोळेकर, लालासाहेब वाघमोडे यांनी महामार्गावरून जाणारे वाहनचालक, तसेच माणगांव येथील अशोकदादा साबळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले. 

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करावा. वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवू नये. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वाहन चालविताना लेनकटींग करू नये. रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये. पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा व नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

१८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय व वाहन चिलविण्याचे लायसन्स मिळविल्याशिवाय मुलांनी वाहन चालवू नये. वाहतूकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन माणगाव वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल येलवे यांनी अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog