निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाबूशेठ खानविलकर यांचा सत्कार समारंभ संपन्न 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण 

खासदार सुनिल तटकरे यांचा विश्वास सार्थकी लावणार - बाबूशेठ खानविलकर 

माणगाव (राजन पाटील) : अतिशय सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलेल्या पण स्वतः च्या कर्तृत्वावर  आपली स्वतः ची प्रतिमा निर्माण करून आज समाजाला नवी प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून निजामपूरसह  माणगाव - महाड मध्ये श्री. बाबूशेठ खानविलकर यांची वेगळी प्रतिष्ठा आहे. 

दीन- दलित, सर्वसामान्य जनतेचे कैवारी, शिक्षण, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी उदारहस्ते मदत करून सर्वसामान्यांचे हितचिंतक म्हणूनही बाबूशेठ खानविलकर यांचे मोठे नाव आहे. अर्थात, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आज प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माणगांव- महाड-पोलादपूर विधानसभा या मतदार संघाच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठी ताकद निर्माण झाली आहे. या योग्य प्रकारच्या निवडीमुळे कार्यकरत्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नुकताच श्री. बाबूशेठ खानविलकर यांचा निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कडापे येथील कालकाई मंदिर सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी निजामपूर विभागातील बहुसंख्य सरपंच व उपसरपंच तसेच विविध विभागातील मान्यवर पदाधिकारी यांच्याकडून तसेच मराठी उद्योजक श्री. सुभाषशेठ दळवी आदी मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम रणपिसे यांनी केले. 

यावेळी विविध मान्यवरांबरोबर शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असलेले मराठी उद्योजक श्री. सुभाषशेठ दळवी उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही बाबूशेठ खानविलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात बाबूशेठ खानविलकर यांनी आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  या विभागाची जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन. सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम वाढवेन, आपल्या मतदार संघातील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्या सोडवून रायगडचे खासदार श्री. सुनिलजी तटकरे यांचा विश्वास सार्थकी लावीन असे उद्गार या सत्काराला उत्तर देताना श्री. बाबूशेठ खानविलकर यांनी काढले. यावेळी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी संदिप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पागार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog