🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

दिव्यांग बांधवांना स्वावलंबन प्रमाणपत्र व युडीआयडी स्मार्ट कार्ड वाटप

तळा (संजय रिकामे) : तळा पंचायत समितीच्या डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात सभापती अक्षरा कदम यांच्या शुभहस्ते दिव्यांग बांधवांना स्वावलंबन प्रमाणपत्र व युडीआय स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पं. स. सभापती अक्षरा कदम, माजी सभापती तथा सदस्या देवकी लासे, प्रभारी गटविकास अधिकारी श्री. प्रभे, राष्ट्रवादी महीला अध्यक्षा जान्हवी शिंदे, तळा तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष किशोर पितळे, ग्रामविकास अधिकारी नेरकर, सचिन कदम ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी दिव्यांग बांधव आणि भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

प्रतिवर्षी ३ डिसेंबर जागतिक अपंग दिन पंचायत समीती कडून साजरा केला जाईल असे आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी श्री. प्रभे यांनी देऊन अपंग व्यक्ती हि अपंग नसते तर खरी सुदृढ असते. विकलांग व्यक्ती आजार असूनही कधी आत्महत्या करीत नाही तर मनाने खंबीरपणे उभी असते बांधवानो खचून जावू नका शासकीय सुविधाचा लाभ मीळून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले शासनाच्या महीलांंचे बचतगट असतात त्याप्रमाणे संघटनेने गट तयार केला तर त्यामाध्यमातून सोयी सुविधा सवलती मिळून देण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही व दिव्यांग बांधव वंचित रहाणार नाही असे आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी श्री. प्रभे यांनी दिले. 

दिव्यांग बांधवांना सामाजिक जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच त्यांचे असणारे प्रश्न व समस्या ह्या सोडविण्याकरिता त्यांना विविध कार्यालयांचे दरवाजे झीजवावे लागतात त्यामुळे दिव्यांग बांधवांना एकाच वेळी एकाच ठिकाणी त्यांना उपलब्ध असलेले दाखले मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. तळा तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष किशोर पितळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी नेरकर यांनी केले.यावेळी १२५ दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र व यु.डी.आय.डी. कार्डचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog