माणगांव तालुका शिक्षक सेना कार्याकारणी जाहीर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गात आनंद!
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार- चंद्रकांत आधिकारी यांची ग्वाही!
माणगांव (राजन पाटील) : जूनी पेन्शन हक्क प्राप्त करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी-निवड श्रेणी, सेवासातत्य, वेतनेत्तर अनुदान, विनाअनुदानावरील शाळांना अनुदान मिळवून देणे, पी. एफ. थांबवलेल्या शिक्षकांचे पी. एफ. सुरू करणे, पी. एफ. च्या पावत्या प्राप्त करणे, शिपाई पदाच्या जागा शासनास भरण्यासाठी भाग पाडणे, शालार्थ प्रणालीत सुधारणा घडवून आणणे असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक सेना सातत्याने प्रयत्न करीत असते. अर्थात, हा प्रयत्न तालुका पातळीवर निर्माण होण्यासाठी शिक्षक सेनेच्या माणगांव तालुका कार्याकारणीची निवड नुकतीच करण्यात आली.
यामध्ये शिक्षक सेना तालुका अध्यक्षपदी श्री. चंद्रकांत सखाराम आधिकारी (साई हायस्कूल) उपाध्यक्ष पदी श्री. रविंद्र कानू भगत, सचिवपदी श्री. दिपक रोहिदास रोकडे, खजिनदार पदी श्री. दिनेश दत्ताराम महाडिक तर सदस्य पदी श्री. गणेश नारायण पवार, श्री. राजन बाळाराम पाटील, श्री. विद्याधर मणिराम जोशी, श्री. कृष्णा सखाराम पानवकर, श्री .सागर गजानन आधिकारी, श्री. नामदेव काशिनाथ लाड, श्री. पांडुरंग बाळू उभारे, श्री. बाबासाहेब सदाशिव साळुंके, श्री. तुकाराम लोटण पाटील, श्री. दिलीप सहादेव देवकर, श्री. उत्तरेश्वर कान्होबा सातपुते, तळा महिला आघाडी प्रमुखपदी सौ. सुजाता म्हात्रे-पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
यावेळी संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत आधिकारी यांनी "तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहिन" असे मत यावेळी व्यक्त केले.