आता सरपंच होणार कोण? कसे असणार ग्रामपंचायतीचे आरक्षण?
तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्ह्यातील 2020-2025 या कालावधीत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी निधि चौधरी यांनी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पारित करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात आरक्षण झाली असून आज तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार अण्णापा कनशेट्टी, निवडणूक तहसीलदार देवदास खेडेकर, गटविकास अधिकारी विलास यादव, नायब तहसिलदार निलेश गावणकर यांच्या उपस्थितीत कै. नाना धर्माधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच तळेवासी आणि पत्रकार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आरक्षणाची सोडत ही कु. नैतीक फुलारे या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी उडवून निवड करण्यात आली. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उसरखुर्द, पिटसई व वानास्ते ग्रामपंचायत - ना.म.प्र.(खुला), काकडशेत, मांदाड, रहाटाड, निगुडशेत ग्रामपंचायत - ना.म.प्र.(महिला), गिरणे-शेणवली ग्रामपंचायती अनु.जमाती (खुला), तळेगांव, पढवण, भानंग, वरळ, मेढा, वाशी ग्रामपंचायत सर्वसारधारण (महीला), वांजळोशी, रोवळा ग्रामपंचायत अनु.जमाती (महिला), सोनसडे ग्रामपंचायत अनु.जाती.(खुला) मालुक ग्रामपंचायत अनु.जाती (महीला), फळशेत, मजगांव, महागांव, बोरघर-पन्हेळी, चरईखुर्द ग्रामपंचायत सर्व साधारण (खुला) अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले सदरची आरक्षण सोडत २०११ च्या जनगणनेनुसार करण्यात आली असून काही जणांचे मनसुबे उध्वस्त तर काहींना लॉटरी लागली आहे.