सुरक्षित व संरक्षित रायगड रोप-वे आजपासून सुरू! 


माणगांव (राजन पाटील) : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्ग-दुर्गश्वर रायगड किल्य वर शारिरीक सक्षमता नसणाऱ्या, अपंग असणाऱ्या आबालवृद्धांना आत्तापर्यंत अखंडित २५ वर्षे सुरक्षित व संरक्षित सेवा देणाऱ्या रायगड रोप-वे ची सेवा आज शुक्रवार दि. ४ डिसेंबर पासून सुरू करण्यात आली असल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

कोविड-१९ च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा याकरिता रायगड रोप-वे ८ महिने बंद होता. तरीही रोप-वे ची सेवा देणाऱ्या संस्थेने रोप-वे च्या कामगार व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना अखंडित व सलग महिन्याचे पूर्ण वेतन व त्याचबरोबर दिवाळीचा बोनस देऊन रायगड रोप-वे च्या कर्मचाऱ्यांना एकदिलाने संघटीत व त्यांच्या कुटुंबाला सुखी ठेवले. दरम्यानच्या काळात हिरकणी वाडीवरील रोप -वे असणाऱ्या जागेसंदर्भातील झालेला वाद न्यायप्रविष्ट होता. अखेर न्यायालयाने रायगड रोप-वे च्या बाजूने निर्णय दिल्याने आज पोलीस बंदोबस्तात रोप-वे सेवा सुरळीत सुरु झाली. खरं तर रोप -वे सेवा परिसरात काही मुठभर लोकांनी स्टॉल लाऊन जागा अडवण्याचा प्रयत्न व शिवभक्तांना रोप-वे ने रायगडावर जाण्यासाठी मज्जाव केला. मात्र पोलीस प्रशासनापुढे त्यांचे काहीही चालले नाही. अखेर पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत रोप-वे सुरळीतपणे सुरू होण्यासाठी पुरक वातावरण निर्माण केले.  

या रायगड रोप-वे च्या सेवेमुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आज सायंकाळ पर्यंत हजारो लोकांनी या रोप-वे सेवेची सेवेचा वापर करून रायगडाचे दर्शन घेतले. यावेळी श्री. योगेश खडतर व योगेश पालकर यांच्यासह अनेक शिवभक्तांनी विशेष आनंद व्यक्त केला.

Popular posts from this blog