हाशिवरे येथून महिला बेपत्ता 

पोयनाड (प्रतिनिधी) : पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाशिवरे (मोकल बाग) येथून मयुरी प्रथमेश घरत (वय २६) ही महिला बेपत्ता झाली आहे. 

सदर बेपत्ता झालेल्या महिलेची उंची १५२.४ से.मी. रंग सावळा, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, गळ्यात साधे मंगळसूत्र, कानात साधी कर्णफुले, नाकात चमकी, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या व सफेद रंगाची पर्स, लाल रंगाची पिशवी त्यामध्ये कपडे, अंगात निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, अंगाने सडपातळ असे वर्णन असून सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. या महिलेबाबत कुणालाही काही माहिती मिळाल्यास पोयनाड पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Comments

Popular posts from this blog