बेकायदा मटका-जुगाराच्या अड्ड्यावर कोलाड पोलीसांची धाड, एकास अटक!
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी
रायगड (भिवा पवार) : कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली असून बेकायदा मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेवाडी नाक्यावर दि. 4 डिसेंबर रोजी आंबेवाडी नाक्यावर बाबा वडापाव गाडीच्या बाजूला पॅरागॉन चप्पल दुकानाच्या जवळ रोडलगत आलीम कादीर नुराजी (वय 31, रा. वरसगाव) हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मेन नावाचा मटका जुगार खेळ खेळताना दिसून आला. त्याला पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध रजि. नं. 70/2020, जुगार अधिनियम 1867 चे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एन. आर. पाटील, एस. एन. कोकाटे, याकूब आयुब तडवी या पथकाने ही धडक कारवाई केली.
दरम्यान, कोलाड पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे मटका-जुगार माफीयांना चांगलाच चाप बसलेला असून पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या या दमदार कामगिरीमुळे कोलाड परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.