माणगांव आश्रमशाळा शालेय समिती अध्यक्ष पदावर महादेव जाधव
माणगांव (राजन पाटील) : प्रशासनाचा गाढा अभ्यास, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध, वक्तशीर, चाणाक्ष, हजरजबाबी, प्रामाणिक, उत्तम वक्तृत्व, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असणारे, वनवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा देऊन मदत करणारे माध्यमिक विद्यामंदिर रातवड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. महादेव सखाराम जाधव यांची कै. विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रचंड अभ्यास व शाळेतील विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे श्री. जाधव सरांना रा.जि.प. चा आदर्श शिक्षक पुरस्कार व रायगड भूषण पुरस्कार असे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षात प्राप्त झाले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते यापूर्वी दोन वेळा सदस्य होते. संघसंस्कारात मोठे झालेले श्री. जाधव सर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे ते विद्यमान सदस्य आहेत. सदयस्थितीमध्ये ते सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे हायस्कूल व जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी हायस्कूलच्या शालेय समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या आश्रमशाळेच्या शालेय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.