वनरक्षकांनी दिले भेकराला जीवदान 

वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मेने व अक्षय मोरे यांची उत्कृष्ठ कामगिरी


माणगांव (राजन पाटील) : सद्यस्थितीमध्ये जंगलाच्या विरलतेमुळे जंगलात राहणारे प्राणी बिनभोपाट मानवी वस्तीमध्ये येतात. अशीच एक घटना माणगांव तालुक्यातील नाणोरे गावात घडली. एक भेकर जातीचे पिल्लूवजा प्राणी नाणोरे गावात घुसले. त्याचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने तो भेकर शैलेष दत्ताराम पाटोळे यांच्या आवारात संरक्षणासाठी आला असता प्राणी मित्र पाटोळे यांनी ही घटना वनविभागाला भ्रमणध्वनीवरून तात्काळ कळवली असता वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई वनरक्षक सचिन मेने व माणगांव विभाग अक्षय मोरे यांनी त्वरित घटनास्थळी जावून पंचनामा करून भेकराला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात भरून वडघर मुद्रे हायस्कूलच्या जवळ असणाऱ्या शिलीमच्या जंगलात सुरक्षित सोडले. 

याकामी वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील, वनरक्षक सचिन मेने, वनरक्षक अक्षय मोरे यांनी आपले कर्तव्य बजावतांना  वाहनलक विवेक जाथव व शिपाई जितेंद्र राऊत यांचे चांगले सहकार्य लाभले. वनरक्षकांच्या या कामगिरीमुळे वडघर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

Popular posts from this blog