विळे, पाटणूस भिरा मार्गावरील पूल व रस्ता रुंदीकरणाचे काम अखेर सुरू

'न्यूज 24 तास मराठी'च्या बातमीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील विळे, पाटणूस भिरा मार्गावरील पूल व रस्ता रुंदीकरणाचे काम लॉकडाऊनमुळे गेली सात-आठ महिने बंद पडले होते. मुंबई, ठाणे, पुणे व अन्य शहरातील रेडझोन ठिकाणे वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांतील महामार्गावरील रस्त्याच्या कामांना लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने लॉकडाऊन काळात रखडलेली कामे पुन्हा नव्याने सुरू झाली. 

राज्यातील रस्त्यांची सर्व कामे कामे सुरू असताना विळे, पाटणूस भिरा रस्त्याचे काम मात्र सुरू होत नव्हते! 20 नोव्हेंबर 2020 रोजी याबाबतचे वृत्त 'न्यूज 24 तास मराठी'मध्ये प्रसिद्ध होताच सा. बां. विभागाने याची दखल घेऊन रस्ता रुंदीकरण व पुलाचे काम त्वरित सुरू केले. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक आंनद व्यक्त करीत आहेत. मार्च 2021 पर्यंत पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण होईल असे खात्रीलायक समजते. 


Comments

Popular posts from this blog