अयोग्य जागेवर शौचालयाचे बांधकाम, नागरिकांची गैरसोय! 

भागाड ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा गैरवापर? 

भागाड/माणगांव (प्रतिनिधी) : भागाड बौद्धवाडी येथील महिला संगीता सखाराम जाधव यांनी ६ महिन्यांपूर्वी ग्रुप-ग्रामपंचायत भागाड यांच्याकडे वैयक्तिक शौचालय मिळावे अशी मागणी केली होती. परंतु वैयक्तिक शौचालयास परवानगी नसल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. गाव हगणदारीमुक्त असल्याने आपणांस शौचालयास परवानगी नाही असे सांगून एक वर्षानंतर सार्वजनिक शौचालयाला मंजुरी देण्यात आली व या मंजुरीसाठी बौद्धवाडीतील नागरिकांना विचारात न घेता अडचणीच्या जागी अर्थात, जिथे जाणे महिलांना व नागरिकांना गैरसोयीचे ठरेल अशा ठिकाणी शैचालय बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे हे शौचालय येथील नागरिकांसाठी असून नसल्यासारखेच आहे. 

याबाबत येथील संगीता सखाराम जाधव यांनी या शौचालयास हरकत असल्याचा अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला आहे. त्यामध्ये हे बांधकाम चुकीच्या व गैरसोयीच्या ठिकाणी करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे  येथे शासनाच्या निधीचा दुरूपयोग तर झालेला नाही ना? असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. परंतु ग्रामपंचायतीने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करून येथील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Popular posts from this blog