माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत! 

शिक्षक सेनेची मागणी 

माणगांव (राजन पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित झालेल्या परिपत्रकानुसार  भारतीय राज्य घटनेचे कलम १९(१)(ग) व्यापार, नोकरी, व्यवसाय तसेच वाणिज्याचे स्वातंत्र्य या संदर्भानुसार रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृ बँकेत होण्यासाठी शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील व जूनी पेन्शन हक्क संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष गजानन म्हात्रे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व रायगड जिल्हा  वेतन पथक अधिक्षक यांच्याकडे पत्र देऊन मागणी केली आहे. 

भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारानुसार  नोकरी, वाणिज्य तथा स्वतः चे अर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने ही मागणी केली आहे. 

सध्याच्या संवेदनशील व अनिश्चित आयुष्य काळ पाहता शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संरक्षण कवच मिळावा, कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्याचे कुटूंब संरक्षित रहावे याकरिता शिक्षक सेनेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

Popular posts from this blog