रायगड भूषण अॅड. परेश जाधव यांच्या हस्ते सायली दळवी यांचा सत्कार
इंदापूर (संतोष मोरे) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर अॅड. सायली दळवी यांची नियुक्ती झाल्याबाबत मराठा समाज तळा-रोहा-माणगांव तालुकाध्यक्ष तथा रायगड भूषण अॅड. परेश जाधव यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
अॅड. सायली दळवी यांनी आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव जनतेसमोर पडला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
त्यांच्या या यशाबद्दल अॅड. परेश जाधव यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी कामगार आघाडी माणगांव तालुका अध्यक्ष गोविंद नाडकर, सुनिल चित्रे, सुरेश साळुंखे, निखील साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment