🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

विळे, पाटणूस, भिरा मार्गावरील पूल व रस्ता रुंदीकरणाचे काम लॉकडाऊनमुळे रखडले! 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : 

माणगांव तालुक्यातील विळे, पाटणूस, भिरा मार्गावरील पूल व रस्ता रुंदीकररणाच्या कामाला जानेवारी २०२० पासून धुमधडाक्यात सुरुवात झाली होती. मार्च महिन्याच्या १५ तारखे पर्यंत ७५% पुलाचे काम झाले होते. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामातही बरीच प्रगती झाली होती. साधारण एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्यक्ष डांबरीकरणाला सुरुवात होणार होती. पुलाचे पूर्ण काम व डांबरीकरण पावसाळ्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु २२ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची घोषणा केली आणि देशातील अनेक विकासकामे ठप्प झाली. साहजिकच देशातील इतर विकास कामांबरोबर विळे, पाटणूस, भिरा मार्गावरील रस्ता रुंदीकरण व पुलाच्या कामालाही खीळ बसली! रायगड जिल्ह्यात कोरोना जवळपास आटोक्यात आल्याचे चित्रं आता स्पष्ट झाले आहे. त्यामळे एसटी बसेस खेड्यापाड्यात धावू लागल्या आहेत. मंदिरे खुली झालीत. पर्यटनस्थळे सुरू झाल्याने पर्यटक पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. आठवड्याचे बाजार सुरू झाल्याने ग्राहक घराबाहेर पडू लागलेत. चाकरमानी गावी येऊ लागलेत. तुळशी विवाहानंतर अनेक लग्नाचे बार उडणार आहेत. त्यामुळे बाजारपेठा, सोनारांची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्रं पहायला मिळत आहे. 

एकंदरीत रायगड जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील थांबलेली विकासकामे सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवल्यास जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत येतील. माणगांव तालुक्यातील विळे, पाटणूस, भिरा रस्त्यालाही त्यामुळे न्याय मिळेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने विळे, पाटणूस, भिरा रस्त्याचे थांबलेले काम लवकरात लवकर सुरू करावे अशी या परिसरातील नागरिकांची प्रमुख मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog