शेतीच्या वादातून नाचणी कणसं नेली चोरून, जाब विचारणाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी!

माणगांव (प्रतिनिधी) : शेतीच्या वादातून नाचणीची कणसं तिघांनी चोरून नेली व याबाबतचा जाब विचारणाऱ्याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, माणगांव तालुक्यातील उमरोली तर्फे खरवली येथे गट नं. ३८७, क्षेत्र ०.०५०, आकार ०.०६ या जमीनीचे भोगवटदार द. क. खोत हे असून या जमिनीमधील वहिवाट ही फिर्यादी योगेश खडतर यांची वडिलोपार्जीत आहे. या जमीनीवर पीक पाणी संदर्भात त्यांची आई आई श्रीमती. विठाबाई काशिराम खडतर यांचे नाव नोंद आहे. या जमीनीत त्यांनी लागवड केलेले नाचणीचे पीकाची नासधूस करून ते पीक फिर्यादीच्या संमतीशिवाय १) नथुराम विठोबा मोरे, २) निवृत्ती नथुराम मोरे व ३) राम बाजी ढेपे (सर्व रा. उमरोली तर्फे खरवली, ता. माणगांव) यांनी चोरून नेले. त्यानंतर याबाबतचा जाब विचारण्यास गेल्यावर निवृत्ती नथुराम मोरे व नथुराम विठोबा मोरे या दोघांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी योगेश खडतर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगांव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक सुनिल शिरसाट हे पुढील तपास करीत आहेत.

Popular posts from this blog