BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS...
अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला... अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला... नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Image
कोल्हापुरात अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलीसांच्या ताब्यात! कोल्हापूर वृत्त (संभाजी पुरीगोसावी) :-   कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यांत भडगांव येथील सौ. सुनीता संजय केसकर (वय 40) हिचा मृत्यू वनप्राण्यांच्या हल्ल्यातून झाल्याचा बनाव अखेर गडहिंग्लज पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी आणि सुनीता केसकर या दोघांचे सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय 34) रा. भडगांव याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सुनुता ही 18 जानेवारी आठवडी बाजारीसाठी घरांतून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 21 दिवसांनी महागांव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदे आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती व्यक्ती जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना चांगलाच संशय आला. मात्र तपासाच्या अनुषंगाने ...

चिंचवलीचे सुपुत्र पोलीस हवालदार रुपेश भोनकर यांचा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडून सन्मान व बढती 

रायगड (भिवा पवार) : रोहा तालुक्यातील कोलाड जवळ असणारी चिंचवली तर्फे दिवाळी येथील माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोनकर यांचे सुपुत्र रुपेश भोनकर हे सध्या खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत. कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस रुपेश भोनकर यांचा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्वतःच्या हाताने फीत लावून सन्मान केला. पोलीस दलात  बढती मिळालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचा सुद्धा स्वतःच्या हाताने फित लावून सन्मान करण्यात आला. यामध्ये चिंचवली गावचे सुपुत्र रुपेश भोनकर यांचाही समावेश आहे.  

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नुकतेच जबाबदारी स्विकारलेले अशोक दुधे यांनी 'पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बढती देणे' हा संकल्प पहिल्यांदाच राबवला असून या संकल्पनेबाबत कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये चिंचवलीचे सुपुत्र सध्या खालापूर पोलीस ठाण्यात असणारे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष म्हणून असणारे पोलीस नाईक रुपेश भोनकर यांना हवालदार म्हणून बढती  मिळाली आहे. याबाबत परिसरातील जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार, कोलाड हायस्कूलचे प्राचार्य शिरीष येरुणकर, पत्रकार भिवा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल भोनकर व चिंचवली ग्रामस्थ यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. पोलीस हवालदार रुपेश भोनकर यांना बढती मिळाल्याबाबत कोलाड परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून पोलीस हवालदार रुपेश भोनकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog