मुबंई-गोवा महामार्गावर आपघातांची मालिका सुरूच! खांब नाक्यावर वडापावच्या दुकानावर केमिकल ड्रम भरलेला ट्रक पलटी
रायगड (भिवा पवार) : गेली अनेक वर्षे मुबंई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. मार्ग कधी होईल याची शाश्वती नाही, मात्र दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील आठवड्यात नागोठणे-कोलाड दरम्यान अपघात घडले. यात काहींचा मृत्यू झाला. कोलाड नजीक एक अपघात झाला होता. या अपघातात एक तरुणाचा अंत झाला, ते होतो ना होतो आज २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोलाड कडून नागोठणेहून मुंबईकडे जाणारा केमिकल ड्रम भरलेला ट्रक चक्क वडापावच्या दुकानात घुसल्याने संपूर्ण खांब नाका हादरला आणि एकच धावाधाव व पळापळ झाली. दैव बलवत्तर म्हणून दुकानदार, मालक व ग्राहक बचावले!
कोलाड कडून नागोठणे मुबंई कडे केमिकलचे ड्रम भरून जाणारा मालवाहू ट्रक KA 25 D 4192 हा खांब येथील नामवंत असलेले व्यवसायिक मंगेश पोटफोडे यांच्या वडपाच्या दुकान घुसला. परंतु सुदैने कोणतीही जीवितहानीची घटना या अपघातात घडली नाही. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने चालक व दुकानातील ग्राहक बचावले. या घटनेची सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सदरच्या अपघातात वडापाव दुकानाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राऊळ, आशिष पाटील, अशोक म्हात्रे, नित्यानंद पवार, समीर कोकाटे, पाटील, ट्रॅफिक हवालदार जे. एस. चेरकर हे क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल होऊन आपघाताच्या घटनेची पहाणी केली व याबाबत अधिक तपास करत आहेत.